Trending
जोगी सखारा गोटुल अभ्यासिके को धन प्रदान करें;सामाजिक कार्यकर्ता दिलीप घोडाम की विधायक अभिजीत वंजारी से मांग
कळमना येथे वादळ-पावसाचा कहर : घरांचे टिन उडाले, महिला जखमी; वीजपुरवठा खंडित, पाणीटंचाईची शक्यता
महात्मा गांधी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्ताने शिक्षक पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात.
बांधकाम कामगारांची नोंदणी
यंदाचा तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार संदीप खडेकर यांना प्रदान

13/06/2026

उमरेड, प्रतिनिधी : मनिष शिंगणे

उमरेड तालुक्यातील कळमना येथे दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळ, वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले. अवघ्या दहा मिनिटांत निसर्गाच्या रौद्ररूपामुळे अनेक घरांचे पत्रे व कवेलू उडाले, झाडे कोसळली आणि वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले.

धर्मेश हरिदास तोडासे (वय ४०) यांच्या घरावरील टिनाचे शेड तब्बल १०० मीटर दूर जाऊन विद्युत तारांवर अडकले. या दुर्घटनेत घरातील अन्नधान्य, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे, टीव्ही, फ्रिज, पंखा आदी साहित्याचे मोठे नुकसान झाले.

या घटनेत भाग्यश्री धर्मेश तोडासे (वय ३५) यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. आशा सेविका चेतना गायकवाड यांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

याशिवाय गुरुदेव गजघाटे, संदीप मांडवकर आणि विलास गायकवाड यांच्या घरांच्या कवेलूंचे नुकसान झाले. येथील सचिन अड्याळवाले यांच्या गोठ्यावर झाड कोसळल्याने एक बैल जखमी झाला.

जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेजवळील झाडेही कोसळून परिसरात मोठे नुकसान झाले. गावातील सुमारे १० वीज खांब वाकले असून त्यापैकी एक खांब पूर्णपणे तुटल्याची माहिती समोर आली आहे.

लाईनमन सुरज रामटेके यांनी दिलेल्या माहितीनुसार वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी किमान दोन दिवस लागू शकतात. त्यामुळे संपूर्ण गावाचा पाणीपुरवठाही विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, पटवारी वर्षा भडांगे यांनी संपूर्ण गावाची पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला. सरपंच वैशाली गायकवाड आणि उपसरपंच किशोर खिरडकर यांनीही गावातील नुकसानीची माहिती देत प्रशासनाने तातडीने मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

Recommended Read