Trending
ब्रेकिंग इनसाईट्स
छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर शहर मे जश्न मनाया गया।
महात्मा गांधी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्ताने शिक्षक पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात.
बांधकाम कामगारांची नोंदणी
यंदाचा तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार संदीप खडेकर यांना प्रदान
ब्रेकिंग इनसाईट्स
छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर शहर मे जश्न मनाया गया।
महात्मा गांधी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्ताने शिक्षक पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात.
बांधकाम कामगारांची नोंदणी
यंदाचा तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार संदीप खडेकर यांना प्रदान
News

यंदाचा तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार संदीप खडेकर यांना प्रदान

2/20/2026

यवतमाळ / प्रतिनिधी

मराठा सेवा संघ आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती महोत्सव २०२६ अंतर्गत यंदाचा प्रतिष्ठेचा तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार दै. पुण्यनगरीचे कार्यालय प्रमुख संदीप खडेकर यांना प्रदान करण्यात आला.१८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथील शिवतीर्थ कार्यक्रम स्थळी दिल्ली येथील वरिष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, बँकेचे उपाध्यक्ष वसंत घुइखेडकर,अर्बन बँकेचे अध्यक्ष नितीन खर्चे, यवतमाळ नगर परिषदच्या विरोधी पक्षनेता वैशाली सवाई, मराठा सेवा संघाच्या विद्या खडसे, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर आदी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी त्यांच्या पत्नी सौ.उज्वला खडेकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.संदीप खडेकर हे गेल्या ३० वर्षापासून निर्भीड पत्रकारिताकरत आहे.सडेतोड लिखाणातून अनेक प्रभावी वृत्तमालिका प्रकाशित करत जिल्हा दणाणून सोडला आहे. पत्रकारिता हे पूर्णपणे सामाजिक क्षेत्र असून समाजातील घडामोडी हेच या क्षेत्राचे मुख्य भांडवल आहे.या भूमिकेतून त्यांनी सातत्याने कार्य केले.जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी,टोळीवादातून सुरू असलेले खुनांचे सत्र,वनविभागातील भ्रष्टाचार अशा गंभीर विषयांवर त्यांनी ठोस भूमिका घेतली. विशेषतः ‘वेध गुन्हेगारीचा’ या वृत्तमालिकेतून त्यांनी अनेक हत्याकांड, यवतमाळ–अमरावती रोडवरील लोहारा परिसरातील खुलेआम सुरू असलेला देहव्यापार, वनवर्तुळात होणाऱ्या अवैध वृक्षतोडी तसेच वनविभागातील घोटाळे आदी विषयांवर सडेतोड आणि धाडसी लिखाण केले.त्यांच्या या निर्भीड, अभ्यासपूर्ण आणि लोकाभिमुख पत्रकारितेची दखल घेत त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.