Trending
ब्रेकिंग इनसाईट्स
छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर शहर मे जश्न मनाया गया।
महात्मा गांधी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्ताने शिक्षक पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात.
बांधकाम कामगारांची नोंदणी
यंदाचा तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार संदीप खडेकर यांना प्रदान
ब्रेकिंग इनसाईट्स
छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर शहर मे जश्न मनाया गया।
महात्मा गांधी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्ताने शिक्षक पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात.
बांधकाम कामगारांची नोंदणी
यंदाचा तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार संदीप खडेकर यांना प्रदान
News

बांधकाम कामगारांची नोंदणी

2/20/2026

गडचिरोली, (जिमाका) दि.20: कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतणीकरण करण्यात येऊन त्यांना विविध योजनांचे लाभ दिले जातात. नोंदणी, नुतणीकरण व लाभाचे अर्ज संगणक प्रणालीवर सादर केल्यावर कर्मचारी व नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत अर्ज निकाली काढले जातात. अर्ज मंजूर / नामंजूर SMS द्वारे कारणासह कामगारास कळविल्या जाते. सदरच्या सेवा मंडळामार्फत नि:शुल्क राबविण्यात येतात. बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनाचा लाभ थेट त्यांच्या बँकेच्या खात्यात देण्यात येत असून, या करीता कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. हि सर्व कामे ऑनलाईन असून ते कोणत्याही एजंट, दलाल, मध्यस्थ किंवा संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत नाही. या ऑनलाईन कामाकरीता कोणीही पैशाची / कमिशनची / लाचेची मागणी केल्यास मंडळाच्या जिल्हा कार्यालयास किंवा लाचलूचपत प्रतिबंधक विभागास तक्रार करावी, अशा प्रकारच्या सुचना मंडळाच्या प्रत्येक जिल्हा कामगार सुविधा केंद्र व तालुका कामगार सुविधा केंद्र येथे लावण्यात आलेल्या आहेत. नोंदणी, नुतणीकरण व लाभासाठी अर्ज प्राप्त झाल्यावर कामगारास त्याने निवडलेल्या तारखेस कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येते. लाभाच्या अर्जासंदर्भातील उपस्थित राहण्याबाबतच्या पत्रात देखील मंडळाकडून देण्यात येणारे लाभ हे विनामूल्य असून, कोणाकडूनही पैशाची अथवा लाचेची मागणी झाल्यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या नि:शुल्क क्रमांक 1064 अथवा दुरध्वनी क्रमांक अथवा ईमेल acbwebmail@mahapolic.gov.in वर तक्रार नोंदवावी, असे नमूद केलेले आहे. त्यामुळे कामगारांची कोणत्याही अमिशास बळी पडू नये. बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठी पात्र असलेल्या कामगारांनीच नोंदणी करण्याचे नियोक्ता / ठेकेदार यांनी त्यांचेकडे काम करीत असलेल्या व नोंदणीसाठी पात्र असलेल्या बांधकाम कामगारांच 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्याचे, तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक किंवा महानगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी यांनी बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठी पात्र असलेल्या बांधकाम कामगारांनाच 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र निर्गमित करावेत, असे आवाहन सिमा.व.शिंदे, उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार, कल्याणकारी मंडळ तथा सरकारी कामगार अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.