Trending
ब्रेकिंग इनसाईट्स
छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर शहर मे जश्न मनाया गया।
महात्मा गांधी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्ताने शिक्षक पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात.
बांधकाम कामगारांची नोंदणी
यंदाचा तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार संदीप खडेकर यांना प्रदान
ब्रेकिंग इनसाईट्स
छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर शहर मे जश्न मनाया गया।
महात्मा गांधी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्ताने शिक्षक पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात.
बांधकाम कामगारांची नोंदणी
यंदाचा तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार संदीप खडेकर यांना प्रदान
News

पारडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

2/20/2026

शिवप्रेमींचा मोठा सहभागकुही : मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गुरुवार दि.१९ फेब्रुवारीला पारडी गावात मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.या निमित्ताने गावातील तरुणांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ​कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन,भगवा ध्वज फडकवून आणि ‘जय भवानी,जय शिवाजी’च्या जयघोषाने झाली. या सोहळ्यात परिसरातील शिवप्रेमींची उपस्थिती लक्षणीय होती. ​या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गावातील अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. प्रामुख्याने अविनाश पोटे,समीर शहारे, गौरव बाळबुधे सुरज डहाके, प्रकाश शहारे, आशिष पोटे, आकाश डहाके, मिथुन डहाके, मधुर डहाके, रोशन पोटे आणि समीर तितरमारे या तरुणांनी पुढाकार घेतला.​तसेच प्रेम शहारे,वरुण महाजन, वैभव डहाके,लक्ष्मण पोटे, ज्ञानेश्वर चापले, हैबत डहाके,अमर पोटे,युगल शहारे, हर्षल बावणे,शुभम धानोरकर, दिपांशु खवास आणि वेदांत पोटे यांनी व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावली. ​ ​कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ मंडळींचेही मोठे सहकार्य लाभले. यामध्ये सर्वश्री रवि महाजन, उपसरपंच नुरेश शुक्ला, पुरुषोत्तम पोटे, नंदू शहारे, पंढरी शहारे, देवा महाजन, दिपक महाजन, सुरेश डहाके आणि गणेश शहारे यांचा समावेश होता. तसेच इंद्रजित चापले, सुधाकर महाजन, विनोद पोटे, जयंत महाजन, पुरुषोत्तम महाजन, बापू डहाके, वसंताजी बालबुद्धे, विलास शहारे, रमेश शहारे, सुभाष पोटे, ब्रम्हानंद बावणे, अमरदिप महाजन, संपत डहाके, मनोज डहाके, गणेश गेडेकर, रविंद्र डहाके, सीताराम पोटे आणि धनपाल आभोने यांनी उपस्थित राहून युवकांचा उत्साह वाढवला. ​यावेळी वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले. संपूर्ण परिसरात भगवे झेंडे आणि सजावटीमुळे वातावरण शिवमय झाले होते.