Trending
महात्मा गांधी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्ताने शिक्षक पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात.
बांधकाम कामगारांची नोंदणी
यंदाचा तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार संदीप खडेकर यांना प्रदान
उमरेडमध्ये ‘गुरुकुल अकॅडमी’चा ७ वा वर्धापन दिन जल्लोषात
पारडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
महात्मा गांधी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्ताने शिक्षक पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात.
बांधकाम कामगारांची नोंदणी
यंदाचा तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार संदीप खडेकर यांना प्रदान
उमरेडमध्ये ‘गुरुकुल अकॅडमी’चा ७ वा वर्धापन दिन जल्लोषात
पारडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
News

महात्मा गांधी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्ताने शिक्षक पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात.

2/20/2026

महात्मा गांधी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्ताने शिक्षक पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्नजय भवानी जय शिवाजी सोबत शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्य संबंधीची समर्पण भावना कृतीत येऊ द्याप्राचार्य डॉ. लालसिंग खालसाआरमोरी दि. २० फेब्रुवारी २०२६शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी -शिक्षक- पालक हा त्रिवेणी संगम आहे. शिक्षकाने विद्यार्थी पालकाची, विद्यार्थ्यांनी शिक्षक पालकाची आणि पालकांनी पाल्य शिक्षकांच्या नियमित संपर्कात राहिले पाहिजे. यामुळे शिक्षण कार्यात सुरळीतपणा येईल. आज शिवजयंती निमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. शहाजीराजे आणि जिजामातेने केलेल्या रामायणातील आणि महाभारतातील कथांच्या आदर्श संस्कारामुळे शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची भावना निर्माण झाली. स्वराज्य निर्मितीसाठी केलेल्या समर्पण व त्यागामुळे त्यांनी आपले ध्येय पूर्ण केले. आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून योजनाबद्ध रीतीने आपले साध्य पूर्ण करणे हा शिवाजी जयंतीचा संकल्प असला पाहिजे. शिक्षक- पालक -विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित विद्यार्थी,पालक आणि गुणवंताचे स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी केले.स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. नसरुद्दीनभाई पंजवानी वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग आणि शिक्षक पालक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षक -पालक -विद्यार्थी मेळाव्यात मा. प्राचार्य बोलत होते. यावेळी मंचावर उपप्राचार्य मा. डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, पालक समितीचे उपाध्यक्ष मा. सुरेश खोब्रागडे, शिक्षक पालक समितीचे सदस्य व प्रमुख वक्ते मा. डॉ. विजय रैवतकर, विद्यार्थी विकास समितीचे प्रा.गजानन बोरकर, प्रा. सत्येंद्र सोनटक्के उपस्थित होते.याप्रसंगी प्रमुख वक्ते मा. डॉ. विजय रैवतकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि वर्तमान’ या विषयावर प्रकाश टाकताना आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंचा वर्तमान स्थितीशी संबंध जोडला. काही नेत्यांना व तथाकथित विचारवंतांना असे वाटते की आज लोकशाही चालू असल्यामुळे शिवाजी महाराजांचे विचार कालबाह्य आहेत. परंतु संपूर्ण भारतातील शेकडो राजे आपल्या जहांगिरी, मांडलिकी आणि सुभेदारी सांभाळत असताना स्वराज्याचा संकल्प घेऊन ते ध्येय साध्य करणे हे फक्त शिवाजी महाराजांनीच केले. शिक्षक पालक व विद्यार्थी या मेळाव्यातून शिवाजी महाराजांनी मावळे जोडणे, त्यांच्यामध्ये स्वाभिमानाची आणि स्वराज्याची भावना तेवत ठेवणे हे काम सोपे नाही. केवळ हिंदूच नव्हे तर काझी हैदर, दर्यासारंग, दौलत खान ही मुस्लिम मंडळी महाराजांची एकनिष्ठ होती. या अर्थाने शिवाजी महाराज खरे धर्मनिरपेक्ष होते. त्यांच्या मनात रयतेच्या बाबतीत सतत तळमळ, सुरक्षा जानमाल याची काळजी होती. रयतेची, स्त्रियांची अब्रू राखणे, शेती, धनधान्य यांचा सांभाळ, याबद्दल रयतेला आनंदी ठेवणे, आपला परका न करता समान न्याय, नीतीमत्तेने कारभार, बुद्धिकौशल्य, सदैव चाणाक्ष व चतुर प्रशासन आजच्या लोकशाहीचीच मूल्य आहेत. या अर्थाने त्यांचे कैसे कैसे बोलणे कैसे कैसे चालणे शिवाजी महाराजांचे रूप आठवले आणि त्यांचा प्रताप आठवला तर युद्धनीती ही आज लोकशाही प्रणालीच आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. विजय रैवतकर यांनी केले.प्रास्ताविकात उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर यांनी विद्यार्थी पालक शिक्षक मेळाव्याची भूमिका सांगितली. पालक- शिक्षक- विद्यार्थी सुसंवाद साधला गेला. यामध्ये पालकांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या आणि सूचनांची नोंद करण्यात आली. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये कला शाखेतून काजल हलामी, करण दिघोरे, मयूर श्रीरामे , आचल तुलावी, वैभव वाडगुरे, पूर्वा तुंबळे, प्राची प्रधान, काजल वाडगुरे विज्ञान शाखेत कु. दिव्या बावणे, मयूर मेश्राम, करण नरोटे, रागिनी शिलार, निशा धोंगडे, लाजू बगमारे, वैदेही मैंद , गायत्री बेहेरे, गायत्री ठवकर, अनिकेत कुथे, प्रियंका बोरकर, अपूर्वा रामटेके, अपूर्वा देशमुख, वाणिज्य शाखेत वैष्णवी नारनवरे, माधुरी अडपल्लीवार, आदर्श गडपायले क्रीडा विभागात गायत्री कन्नाके यांना सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. गजानन बोरकर तर आभार सतेंद्र सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. दिलीप घोनमोडे, प्रा. डॉ. नरेश बनसोड, प्रा. डॉ. किशोर वासुर्के , प्रा. स्नेहा मोहुर्ले, प्रा. डॉ. सीमा नागदेवे, प्रा. डॉ. गजेंद्र कढव, प्रा. अनिल राऊत, प्रा. डॉ. वैभव पडोळे, प्रा. डॉ. कविता खोब्रागडे, प्रा.डॉ. पराग मेश्राम, प्रा. डॉ. छगन मुंगमोडे, प्रा. डॉ. विजय गोरडे,प्रा. संजय गिरडकर व समितीच्या सदस्यांनी प्रयत्न केले. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.